उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून, काल मतदानाचा सहावा टप्पा पार पडला. या टप्प्यात ५५.७९ टक्के मतदान झाले. या टप्प्यात दिग्गजांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.