देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू गुरुवार दि. ३ मार्च रोजी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. या भेटीत नायडू यांच्या हस्ते गोवा राजभवनतर्फे बांधण्यात आलेल्या नवीन दरबार सभागृहाचे उद्घाटन दि. ४ मार्चला सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तेवर येणार्या नवीन सरकारचा शपथविधी या नवीन दरबार सभागृहात होणार आहे.