>> ६११३ बाधित, १०८ जणांचा बळी
राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या नवीन बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या महिन्यात नवीन ६११३ बाधित आढळून आले असून कोरोनाने १०८ जणांचा बळी घेतला आहे. जानेवारीच्या तुलनेत नवीन बाधिताच्या संख्येत घट झाली आहे. जानेवारी महिन्यात नवीन ५८ हजार ०३४ बाधित आढळून आले होते. तर, १७१ जणांचा बळी गेला होता. फेब्रुवारी महिन्यात ७१ हजार २९८ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. या फेब्रुवारीत कोरोनाबाधित आढळून येण्याचे सरासरी प्रमाण ८.५७ टक्के आहे.
जानेवारी – फेब्रुवारीत
ओमिक्रॉनचे २०२ बाधित
राज्यात कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेत जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात ओमिक्रॉनचे २०२ बाधित आढळून आले असून डेल्टाचा १ बाधित आढळून आला आहे. आरोग्य खात्याने या दोन महिन्यात ७१९ नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील ३५२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून २०२ ओमिक्रॉनबाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
जानेवारी महिन्यात ३०६ नमुने पाठविले होते. त्यातील १८६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात ५४ ओमिक्रॉन आणि १ डेल्टाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, फेब्रुवारीत ४१३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील १६७ नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ओमिक्रॉनचे १४८ बाधित आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८२१ एवढी झाली आहे. यात २० मृत्यू हे ऑगस्ट २०२० ते जून २०२१ याकाळातील आहेत. फेब्रुवारी महिन्यात नवीन बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १००५ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.
४८ जण कोरोनामुक्त
राज्यात मागील चोवीस तासांत आणखी ४८ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे.
फेब्रुवारीत कोरोनाचा प्रभाव ओसरला