किरण कांदोळकरांकडून ‘त्या’ अफवांचे खंडन

0
11

तृणमूल कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला ही निव्वळ अफवा आहे, असे किरण कांदोळकर यांनी काल स्पष्ट केले.

तृणमूल कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना करताना राष्ट्रीय उपाध्यक्ष, राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याची अफवा पसरली होती. यावर कांदोळकर यांनी स्पष्टीकरण दिले. आपल्या राजीनाम्याचे वृत्त ही निव्वळ अफवा आहे. आपण विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूलच्या सर्व उमेदवारांची मंगळवारी बैठक घेणार असून, निवडणूक मतदानाचा आढावा घेणार आहे, असेही कांदोळकर यांनी म्हटले आहे.