वजन आणि माप खात्याने उसगाव-फोंडा भागातून प्रमाणित नसलेली २३ इलेक्ट्रॉनिक वजनमापाची यंत्रे जप्त केली आहेत. त्यात सराफी दुकानातील एका वजनमाप यंत्राचा समावेश आहे. वजन आणि माप खात्याच्या अधिकार्यांनी उसगाव भागातील दुकानांतील वजनमाप यंत्राची एका मोहिमेत तपासणी केली. त्यात २३ यंत्रे संबंधित यंत्रणेकडून प्रमाणित करून घेतली नसल्याचे आढळून आले. वजनमाप यंत्रे प्रमाणित न केलेल्या व्यापार्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.