कर्नाटकात हिजाब घालून आलेल्या ५८ विद्यार्थिनींना केले निलंबित

0
13

कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणार्‍या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने करणार्‍या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणार्‍या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले. राज्य सरकारचा आदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाद्वारे विद्यार्थिनींना वर्गात हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालण्यास मज्जाव करण्यात आला असूनही मुली हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आल्या होत्या. दरम्यान, याबाबत सदर विद्यार्थिनींनी आम्हाला प्राचार्यानी निलंबित केले तसेच पोलिसांनीही आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखल्याचे सांगितले.