गोव्याबरोबरच देवभूमी उत्तराखंडमध्ये काल एकाच टप्प्यात ७० जागांसाठी मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये ६२.५० टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले. २०१७ च्या निवडणुकीत उत्तराखंडमध्ये ६५.६४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी पडली असून, त्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात बहुतांश मतदान केंद्रांवर तुरळक मतदार दिसून येत होते. दुपारी १२ नंतर मतदानास गती मिळाली. यावेळी युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात केवळ ५.१५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदान वाढत गेले. ११ वाजेपर्यंत १८.९७ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३५.९७ टक्के आणि ३ वाजेपर्यंत ४९.२४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर मतदान प्रक्रिया थंडावली उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये कमी मतदान झाल्याचे दिसून आले, त्या ठिकाणी ५२.९३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ६८. ३७ टक्के मतदान हरिद्वार जिल्ह्यात झाले.
उत्तर प्रदेशात ६२ टक्के मतदान
उत्तर प्रदेशात काल दुसर्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ९ जिल्ह्यांतील ५५ जागांसाठी ६२ टक्के मतदान झाले.