पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंजाबमधील जालंधर येथील एका प्रचारसभेला संबोधित केले. यापूर्वी फिरोजपूरमध्ये त्यांची निवडणूक रॅली होऊ शकली नव्हती. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनादरम्यान राज्यात एनडीएचे सरकार स्थापन होणार असून, राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. पंजाबसोबत आपले जुने नाते आहे. नवा पंजाब तयार करण्यासाठी आपण संकल्पबद्ध आहोत. नवा भारत तेव्हाच तयार होईल, जेव्हा नवा पंजाब बनेल. नवा पंजाब हा कर्जमुक्त असेल. त्यामुळे पंजाब आता फुट पाडणार्यांऐवजी विकास करणार्या पक्षाच्या बाजूने उभा राहिला आहे, असेही ते म्हणाले.