उत्तर प्रदेशमधून वेगळ्या झालेल्या उत्तराखंड राज्यात आज एकाच टप्प्यासाठी मतदान होत आहे. या राज्यातील ही पाचवी विधानसभा निवडणूक आहे. उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रचाराची मुदत शनिवारी संपली असून आज १४ फेब्रुवारीला ७० जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता असून कॉंग्रेसने त्यांना जोरदार आव्हान दिले आहे. हिमवृष्टी होत असल्याने निवडणूक आयोगापुढेही आव्हानात्मक स्थिती आहे.