अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सावर्डे मतदारसंघातून ७ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सर्व सातही उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. विनायक उर्फ बालाजी गावस (मगो), गणेश गावकर (भाजप), अनिल गावकर (आप), खेमलो सावंत (कॉंग्रेस), विपीन नाईक (रिव्होल्युशनरी गोवन्स), दीपक पाऊसकर (अपक्ष) व गंगाराम लांबोर (अपक्ष) अशा सात उमेदवारांमध्ये सावर्डेत लढत होणार आहे.
घरोघरी प्रचारासाठी सध्या २० कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. तर खुल्या जागेत एक हजार किंवा ५० टक्के क्षमतेने बैठक किंवा सभा घेण्यास नियम शिथिल करण्यात आले आहेत.