केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या प्रचारासाठी रविवार दि. ३० जानेवारी रोजी गोवा दौर्यावर येणार आहेत.
या दौर्यात अमित शहा हे भाजपच्या सर्व उमेदवारांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय पक्षाच्या प्रचारासाठी ते आभासी पध्दतीने राजकीय सभाही घेणार आहेत.
अत्याधुनिक दृक-श्राव्य माध्यमाच्या सहाय्याने ते एकाच वेळी गोव्यातील चाळीसही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना उद्देशून भाषण करणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीनची सोय करण्यात येणार आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वे सध्या अमलात असल्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठी भाजपने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने या माध्यमातून प्रचाराच्या एक-दोन फेर्या यापूर्वीच पूर्ण केलेल्या आहेत.