>> वेळ आल्यावर निर्णय घेणार
मनोहर पर्रीकर यांचा पुत्र म्हणून उमेदवारी घ्यायची असती तर पोटनिवडणुकीच्या वेळी घेतली असती. केवळ पर्रीकर पुत्र म्हणून उमेदवारी नको. आज राजकारणात ज्या गोष्टी घडतात त्या सहन होत नाहीत.
वडील मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधित्व केलेल्या पणजी मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जात असताना आम्ही घरी का बसावे? यात बदल झाला पाहिजे. चारित्र्य, प्रामाणिक, जिंकण्याची क्षमता याला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काल उपस्थित केला. वडिलांसोबत १९९४ पासून काम करणारे कार्यकर्ते माझ्याबरोबर प्रचारासाठी फिरत आहेत. मी वेळ आल्यावर योग्य निर्णय घेणार आहे, असेही उत्पल यांनी म्हटले आहे.