गुवाहाटीवरुन बिकानेरला जाणार्या बिकानेर एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले असून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्यात येत आहे. काल संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले. अचानक झटका बसल्याने हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची तातडीने दखल घेतली असून रेल्वेमंत्र्यांकडून याबाबतची माहिती मागवली आहे.