गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी दिली आहे. उषा मंगेशकर यांनी, दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना लोकांबरोबर बोलणे टाळण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगितले. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.