मगो पक्ष व तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील जागा वाटपसंबंधीची बोलणी व चर्चा येत्या १३ ते १४ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
आम्हाला किती जागा हव्या आहेत व कुठल्या कुठल्या मतदारसंघांत मगो पक्षाचे वर्चस्व आहे याची कल्पना आम्ही आमच्याबरोबर निवडणुकपूर्व युती केलेल्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाला दिलेली आहे, असे ढवळीकर म्हणाले.
मगो पक्ष व तृणमूल कॉंग्रेस पक्ष यांच्यात आगामी गोवा विधानसभेसाठी निवडणूकपूर्व युती झालेली असली तरी दोन्ही पक्षात अजून जागा वाटप होणे शिल्लक आहे. हे काम येत्या १३ ते १४ जानेवारीपर्यंत म्हणजेच निवडणुकीला एक महिना शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असल्याचे काल दै. नवप्रभाशी बोलताना ढवळीकर यांनी स्पष्ट केले.