पर्वरी येथील साई सर्व्हिस शोरूममध्ये बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे खळबळ उडाली. पोलीस, दहशतवादविरोधी पथक, अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी याबाबत माहिती मिळताच शोरूममध्ये धाव घेऊन बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्रतपासणीअंती बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे उघड झाले.
साई सर्व्हिस शोरूममध्ये काल दुपारी १२ च्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. शोरूमच्या व्यवस्थापनाने याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला दिली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाच्या साहाय्याने शोरूममध्ये सर्वत्र तपासणी केली. दरम्यान, पोलिसांनी निनावी फोन करणार्याचा शोध घेत एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.