सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
22

अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल बुधवारी दुपारी पुण्यातील ठोसर पागेत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी करण्यात आले.

सिंधुताईंच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील नेतेमंडळी, साहित्यिक, असंख्य तरुण-तरुणी उपस्थित होते. सिंधुताईंना अखेरचा निरोप देताना नागरिक भावुक झाल्याचे यावेळी दिसून आले. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.

सिंधुताईंचा जन्म महानुभाव पंथात झाला होता. त्या महानुभाव पंथाचे आचरण करत होत्या, त्या निस्सीम कृष्णभक्त होत्या. महानुभाव पंथामध्ये अग्निसंस्कार केले जात नाहीत तर पार्थिव दफन करतात. त्यामुळेच, सिंधुताईंच्या पार्थिवावरही दफनविधी करत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महानुभव पंथात दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले. त्यानंतर दफनस्थळी नेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.