भाजपशासित राज्यांत ख्रिस्ती धर्मीयांवर हल्ले

0
16

>> गिरीश चोडणकर यांचा आरोप

भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यांत आता ख्रिस्ती धर्मीयांवर हल्ले होऊ लागले असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केला. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे सर्व प्रकार केले जात असल्याचेही ते म्हणाले.

२०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील अल्पसंख्याकांना ते दुय्यम नागरिक असल्यासारखी वागणूक दिली जाऊ लागली आहे. हिंदूंच्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप ही चाल खेळत आहे. भाजपला भारतातील धर्मनिरपेक्षता संपवून टाकायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा आरोपही चोडणकर यांनी यावेळी केला.
पंतप्रधानांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे चर्चवर हल्ला करण्यात आला. आसाम राज्यात चर्चमध्ये प्रार्थना चालू असताना ती उधळून लावण्यात आली. हरियाणातील गुरुग्राम येथे नाताळ सणाचा उत्सव चालू असताना तो उधळून लावण्यात आला, अशा काही घटना चोडणकर यांनी नमूद केल्या.

तसेच काही ठराविक एनजीओ व धर्मादाय संस्थांना मिळणारी मदत बंद करून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोव्यातील भाजप सरकारमध्ये जे ख्रिस्ती मंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ख्रिस्ती बांधवांवरील हल्ले बंद केले जावेत अशी मागणी करणारे एक पत्र पंतप्रधानांना लिहावे.
चोडणकर