कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सध्या या पोलीस स्थानकाचा ताबा निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सौझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सौझा लोबो रेस्टॉरंटवर मंगळवारी हल्ला करून कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली होती.
तसेच रेस्टॉरंटमध्ये घुसून नासधूस करण्यात आली होती. या प्रकरणी कारवाई होत नसल्याने प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेण्यात आले. विरोधी राजकीय पक्षांनीही याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणी सध्या पोलीस निरीक्षक रापोझ यांना निलंबित केले आहे.