गुजरातमधील बडोद्यात एका रासायनिक कारखान्याला शुक्रवारी लागलेल्या आगीत चार कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. बॉयलर फुटल्याने ही आग लागली. आग लागण्यापूर्वी मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व तंनी ाग विझवली.
या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या असून मोठा आवाज झाल्याने काही घरांना आणि फ्लॅटना तडेही गेले आहेत. या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला असून किमान १५ जण जखमी झाले असल्याचा संशय आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कारखान्याजवळ राहणार्या कामगारांच्या कुटुंबातील मुलेही या अपघातात जखमी झाली आहेत.