पणजी राजधानीसह तिसवाडी तालुक्यात पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी भोम – बाणस्तारी येथे फुटल्याने पणजीसह आसपासच्या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
भोम येथे विद्युत काम करताना जलवाहिनीची नासधूस झाली आहे. पणजीसह तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ, सांतआंद्रे (भाग) या मतदारसंघातील अनेक भागातील नळ कोरडे पडले आहेत. जलवाहिनी फुटल्याने बुधवारी पाण्याचा पुरवठा झाला नाही.
गुरूवारी मर्यादित पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांनी साठवून ठेवलेले पाणी संपल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.