वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधिमंडळ सचिव एन. ए. उल्मन यांच्याकडे सुपूर्द केला. आल्मेदा यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
आल्मेदा हे वास्को मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी कदंब महामंडळाचे अध्यक्षपद तसेच तीन वेळा नगरसेवक तथा नगराध्यक्षपद भूषविले आहे.
भाजपने आपल्याला दुखावल्यानेच मला पक्ष सोडणे भाग पडल्याचे आल्मेदा यांनी यावेळी सांगितले. यानंतर कुठल्या पक्षात जायचे त्याबाबतचा पुढील निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेईन असे यावेळी आल्मेदा यांनी सांगितले.
मुरगाव मतदारसंघातून मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा तर कुठ्ठाळी मतदारसंघातून एलिना साल्ढाणा यांनी आमदारकीचा यापूर्वी राजीनामा दिला आहे.