भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काल दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर आले आहेत. त्यांचे दाबोळी विमानतळावर गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्वागत केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊ ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय नेत्यांचा वावर सुरू झाला असून कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल झाले. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही गोव्यात येऊन गेल्या. त्या अगोदर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हेही गोव्यात येऊन गेले.