ऐश्वर्या राय बच्चन हिची ईडीकडून कसून चौकशी

0
9

पनामा पेपर लीक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची काल तब्बल ५ तास ईडी चौकशी झाली. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही चौकशी करण्यात आली. ईडीने ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावले होते.

त्यानंतर ऐश्वर्या स्वतः चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली होती. या ठिकाणीच तिची चौकशी झाली. यावेळी ऐश्वर्याला ईडीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. पनामा पेपरमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे असून, त्यांनी फसवणूक आणि करचोरी केली आहे.

या यादीमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबातील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अमिताभ बच्चन यांच्याशीही संबंध असून, कर वाचवण्यासाठी त्यांनी शेल कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे.