केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशमधील जनतेला अमेरिकेसारखे रस्ते देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तुम्हाला योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवावा लागेल, अशी अट मात्र गडकरी यांनी यावेळी घातली.
उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जनसंपर्काचा धडाका लावला असताना सत्ताधारी भाजपने विकासकामांच्या उद्घाटनांचा आणि नवीन कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मिर्झापूर येथे ३ हजार ३७ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या ४ महामार्गांचे लोकार्पण केले, तर जौनपूर येथे ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.