राजस्थानमध्ये काल संध्याकाळी ६.५६वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी संध्याकाळच्या सुमाराला अचानक घरांमध्ये हादरे जाणवायला सुरुवात झाली. भूकंपाची जाणीव झाल्यानंतर लोक घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. काही वेळ भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यानंतर हादरे बंद झाले.
राजस्थानच्या बिकानेर भागात भूकंपाची सर्वाधिक तीव्रता जाणवली. रविवारी संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.