जनरल बिपीन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार

0
20

तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील ८०० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी यांचे पार्थिव काल शुक्रवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र, इतर सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, खासदार मल्लिकार्जुन खरगे, हरीश रावत, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि डीएमकेचे ए. राजा आणि कनिमोई उपस्थित होते.