उत्तराखंडमध्ये काल एका बसला झालेल्या भीषण अपघाताता बस दरीत कोसळून ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. डेहराडून येथे हा अपघात झाला. ही बस दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस, एसडीआरएफच्या टीम दाखल झाल्या आहेत. अपघाताची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.