भाजपच्या राजवटीत गोव्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ

0
25

>> महिला कॉंग्रेसच्या नीता डिसोझा यांची टीका

गोव्यात भाजपच्या राजवटीत महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे, अशी टीका काल भारतीय महिला कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय उपाध्यक्ष नीता डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत केली.

गोव्यातील महिलांवरील अत्याचारात सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे. गोव्यातून बेपत्ता होणार्‍या महिलांचा शोध लागत नाही.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत महिलांमध्ये जागृती करून भाजप सरकार महिलांच्या विरोधात काम करीत असल्याचे महिलांना दाखवून देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कॉंग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्याची गरज आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.

गोव्यातील नागरिकांना बेकारीला तोंड द्यावे लागत आहे. बेकायदा कामांत वाढ झाली आहे, असा आरोप डिसोझा यांनी यावेळी केला. यावेळी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.