आता मुख्यमंत्री बदलून परिणाम शून्य : आप

0
37

भाजपने आता कितीही मुख्यमंत्री बदलले, तरी मतदारांवर आता त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या विरोधातील जनभावना वाढतच चालली आहे, अशी टीका आपचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हटवून त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड भाजप करू पाहत असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा गौप्यस्फोट नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता, त्याला भाजपने अद्याप उत्तर दिले नसल्याचे नाईक म्हणाले.

भाजपचे अपयश गोवेकरांना स्पष्ट दिसत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्यावेळी सरकारने रुग्णांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने शेकडो लोकांचे प्राण गेले, असेही नाईक म्हणाले.