सलग दुसर्‍या दिवशी शून्य कोरोना बळी

0
33

राज्यात गेल्या २४ तासांत सलग दुसर्‍या दिवशी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात नवे २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५१५ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३५८ एवढी आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के एवढे आहे. तसेच गेल्या २४ तासांत एका व्यक्तीला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला, तर ३ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. नव्या बाधितांपैकी २६ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.