गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ माजी नेते ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
आपचे नेते वाल्मिकी नाईक, महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो यांच्या उपस्थितीत त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. ऍड. नार्वेकर हे थिवी, हळदोणा व पर्वरी या तिन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून आलेले आहेत. नार्वेकर यांच्या आपमधील प्रवेशानंतर बोलताना शिरोडा मतदारसंघाचे माजी आमदार व आपचे नेते महादेव नाईक यांनी, दयानंद नार्वेकर यांच्या आपमधील प्रवेशाने ‘आप’ला १२ हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे असे म्हटले आहे.
नार्वेकर हे गोव्यात आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी बाहेर पडतील तेव्हा राज्यात आपच्या प्रवासाला गती येईल, असा विश्वासही नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.