पणजीत युवा कॉंग्रेसचा मोर्चा

0
28

>> पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीमार

राज्यातील भाजप सरकारच्याविरोधात काल युवा कॉंग्रेसने पणजीत मशाल मोर्चा काढला. या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात युवा कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झाले. या मोर्चात युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी या मशाल मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी निषेध केला आहे. शांततेने मोर्चा काढलेल्या युवा कार्यकर्त्यांवर विनाकारण लाठीहल्ला करून भाजप सरकारने आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडवले असल्याचा आरोप यावेळी चोडणकर यांनी केला.