भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

0
32

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप

ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते मिळत नसल्याचे काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी शून्य तासाला गोवा विधानसभेत सभागृहाच्या नजरेत आणून दिले. त्यांना हक्काने जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे मिळवून देण्याचे सरकारने आश्‍वासन द्यावे, अशी मागणी केली. मात्र, समाज कल्याण खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी ओबीसी कोट्यातून भंडारी समाजाला आरक्षण मिळत असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा पालयेकर यांनी केलेला आरोप फेटाळून लावला.

अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर यांनी, सरकारने ह्या विषयावर चर्चा करायला हवी होती. आरक्षणाखाली आरक्षण देणे शक्य आहे. या संदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेतला आहे. आरक्षण ही एक सकारात्मक कृती आहे. आणि अशा स्थितीत अन्याय होता कामा नये, असे सरदेसाई म्हणाले.
आपण सत्तेत आल्यास भंडारी समाजाला न्याय देणार असल्याचे ते म्हणाले.