गोवा कॉंग्रेस समितीच्या कार्याध्यक्षपदी रेजिनाल्ड

0
30

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष म्हणून कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काल स्पष्ट केले. जेम्स आंद्राद यांची गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार रेजिनाल्ड यांची नाराजी दूर करण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.