राज्यातील विद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग आज सोमवारपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क परिधान करावे लागणार असून सामाजिक अंतराचे पालन करावे लागणारआहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची रोज तपासणी करण्यात येणार आहे. मात्र या विद्यालयांना सकाळची प्रार्थना आयोजित करता येणार नाही. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत असे कळवले आहे.