केरळमध्ये मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

0
47

केरळमध्ये परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. राज्यातील कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ तर इडुक्कीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.