चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात २ मृत्यू, ५६ बाधित

0
37

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २ कोविड रुग्णांच्या बळींची नोंद काल झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या ३३२५ झाली आहे. नवे ५६ बाधित रुग्ण आढळून आले असून त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ७४८ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत तीन रुग्णांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले तर ७ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काल शुक्रवारी राज्यातील ८५ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्याचे प्रमाण ९७.७० टक्के एवढे आहे. ४९ जणांनी होम आयसोलेशनच्या पर्याय स्वीकारला आहे.