पुण्यातून गोव्यात येणार्‍या बसमधून ६ किलो ड्रग्ज जप्त

0
38

पुणे शहरातून गोव्यात येणार्‍या एका बसमधून सहा किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मोस्माकिला धुनिया नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ३ कोटी रुपये किंमत आहे.

तर भारतीय बाजारपेठेत त्यांची किंमत ३३ लाख रुपये आहे. भोर विभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी छापा मारून ही कारवाई केली. पुणे ग्रामीण पोलिसंच्या रायगड पोलीस ठाण्याच्या पथकाने खेड शिवापूर नाक्यावर गोव्यात येणार्‍या या बसमधून हे अमली पदार्थ जप्त केले.