आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाची शक्यता

0
52

शनिवारपर्यंत राज्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्यामुळे आज शुक्रवार व उद्या शनिवारपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

आज शुक्रवार व उद्या शनिवारपर्यंत राज्यातील विविध भागांत ताशी ४० कि. मी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून त्याचबरोबर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. वेधशाळेने राज्यात ‘एलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. हवामान खात्याने प्रशासनाला सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे आज व उद्या राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.