फार्मसी व्यावसायिकांच्या बंदला गोव्यातूनही पाठिंबा

0
51

बेकायदेशीरपणे इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याच्या पध्दतीस विरोध करण्यासाठी ८ लाख सदस्य असलेल्या अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट (एआयओसीडी) संघटनेने दि. ३० मे रोजी पुकारलेल्या बंदास केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन गोवाने पाठिंबा जाहीर केला आहे.
औषध विक्री हा अत्यंत संवेदनशील विषय असून ई-पोर्टल माध्यमातून त्याची विक्री करणे म्हणजे रोगा पेक्षाही इलाज वाईट, असे आहे. त्यामळे या निर्णयास संघटनेचा विरोध असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला निवेदनाद्वारे कळविले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
शहरातही इंटरनेट जोडणी मिळणे कठीण होते. त्यामुळे औषधांचा तपशील देणे कठीण आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात औषधांची टंचाई निर्माण होईल, असे संघटनेने केंद्र सरकारला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बंदात गोव्यात सर्व सदस्यांनी सामील व्हावे, असे आवाहन गोवा शाखेचे अध्यक्ष प्रसाद तांबा यांनी केले आहे.