बनावट लशीबाबत सतर्कता बाळगा

0
35

>> केंद्राकडून राज्यांना पत्राद्वारे सूचना

केंद्र सरकारने राज्यांना लिहिलेल्या एका पत्रात राज्य सरकारने नागरिकांना देण्यात येत असलेली कोरोनाची लस तपासून द्यावी असे सूचवले आहे. कोरोनाची लस बनावट असून शकते. ती लस नागरिकांना देण्यापूर्वी ती बनावट आहे की नाही? हे पाहून मग द्यावी अशी सूचना केंद्राने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहिले आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत कोरोनावरील बनावट कोविशिल्ड लस आढळून आली आहे. यामुळे राज्यांनी सतर्क रहावे, असे केंद्र सरकारने पत्रात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही बनावट लसीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने खरी लस ओळखण्यासाठी राज्यांना माहिती पाठवली आहे. यामुळे लस खरी आहे की बनावट हे ओळखता येईल. यात सरकारने कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या तिन्ही लशींचे लेबल, रंग, ब्रँड नेमबद्दल माहिती शेअर केली आहे.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत ६८.४६ कोटी नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. केंद्र सरकारने ईशान्येतील राज्यांसह एकूण ११ राज्यांना ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लशीचा दुसरा डोस लवकरात लवकर देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये कोरोनावरील लसीकरण मोहीम मंदावल्यामुळे केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड यातील बनावट लशी कशा ओळखाव्यात ते स्पष्ट केले आहे. तसेच रशियातून भारतात आयात करण्यात येत असलेली स्पुतनिक व्ही ही लस दोन वेगवेगळ्या प्रकल्पातून आयात केली जाते. यामुळे उत्पादन करणार्‍या दोन वेगवेगळ्या कंपन्यांची नावे असतील. याशिवाय सर्व माहिती सारखीच असेल असे सांगितले आहे.