दिल्लीत १ सप्टेंबरपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार

0
39

दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्लीतील शाळा १ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत येईल तर त्यानंतर ८ सप्टेंबरपासून इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग सुरू होतील. काल शुक्रवारी दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकार शाळा उघडण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगितले होते.