निवडणुकीसाठी लवकरच मतदारनिहाय जाहीरनामा तयार करणार ः सरदेसाई

0
39

येत्या २०२२ सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पक्ष मतदारसंघनिहाय जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी आपण आपल्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह विविध मतदारसंघाचे दौरे सुरू केले असल्याचे काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांत आंद्रे मतदारसंघाच्या दौर्‍यावेळी बोलताना स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्ड मतदारसंघ केंद्रीय जाहीरनामा तयार करणार असून लोकांनी आपल्या पक्षाला कौल दिल्यास राज्यात विकासाला चालना मिळेल असे ते म्हणाले.

सरदेसाई यांनी काल रविवारी सांत आंद्रे मतदारसंघात दौरा करून तेथील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जगदीश भोबे, कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, दुर्गादास कामत, सहसचिव जॉन नाझारेथ व हजर होते.