मिकी पाशेको यांचा कॉंगे्रस पक्षात प्रवेश

0
46

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक नेत्यांनी आता विविध पक्षांत प्रवेश करण्याचे सत्रच आरंभिले असल्याचे दिसून येत आहे. काल माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी नवी दिल्लीत पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हजेरीत कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. यापूर्वी मिकी पाशेको यांनी युगोडेपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून विजय मिळवलेला आहे. काही काळ ते भाजपमध्ये तसेच गोवा सुराज पार्टीतही होते. नंतर त्यांनी स्वत:च्या गोवा विकास पार्टीची स्थापना केली होती. आता त्यांनी अधिकृतपणे कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे.