कार्मिक खात्यातील बदल्यांच्या आदेशाला स्थगिती

0
49

गोवा नागरी सेवेतील काही कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या परवा बदल्या करण्यात आल्यानंतर त्या प्रश्‍नावरून सरकारमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे काही मंत्री नाराज होऊन चिडल्याचेही दिसून आले.

त्यामुळे कार्मिक खात्याने काल एका आदेशाद्वारे सदर बदल्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. आपणाला विश्‍वासात न घेताच कार्मिक खात्याने अधिकार्‍यांच्या बदल्या कशा काय केल्या, असा प्रश्‍न करून काही मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच ह्या बदल्या रद्द केल्या जाव्यात अशी मागणीही केली हाती.

या पार्श्‍वभूमीवर ह्या कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश काल कार्मिक खात्याने स्थगित ठेवला. त्यासंबंधीचा आदेश खात्याच्या संयुक्त सचिव (कार्मिक) मेघना शेटगावकर यांनी काल काढला.