सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा हजारावर

0
38

>> चोवीस तासांत ३ मृत्यू, १०२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे १०२ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०२९ एवढी झाली असून पुन्हा एकदा एक हजारावर सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३१५६ एवढी झाली आहे. राज्यातील नवीन रुग्णामध्ये वाढ होत आहे.

राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.७२ टक्के एवढे आहे. इस्पितळातून ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७१ हजार ६०८ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत ५९३२ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १०२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. राज्यातील सर्वच भागांतील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे.
मडगावात सर्वाधिक ८४ रुग्ण आहेत. पणजी ७१, कासावली ६१, सांगे ५१ रुग्ण असून इतर ठिकाणी पन्नासपेक्षा कमी रुग्ण आहेत. नवीन १७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

नवीन ८५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील आणखी ८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६७ हजार ४२३ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५६ टक्के एवढे आहे.

राज्यातील १ लाख नागरिक लशीविना

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

राज्यातील सुमारे १ लाख नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला नाही. मतदार यादीनुसार पडताळणी करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
लशीचा डोस न घेतलेले नागरिक गोव्यात राहतात की नाही याची चौकशी करावी लागणार आहे. साधारण एक लाख लोकांनी लस घेतलेली नाही. हा आकडा कमीही असू शकतो. आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरूच आहे. आत्तापर्यंत १३ लाख नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.