जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांत घट

0
81

मागील काही काळात जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवादी कारवाया आणि दगडफेकीच्या घटनांत प्रचंड घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दगडफेकीच्या घटना तब्बल ८८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती दिली. या व्यतिरिक्त, हिंसक घटनांत जखमी किंवा मृत होणारे सुरक्षा दलाच्या जवान आणि बंडखोर नागरिक यांची संख्यादेखील ९३ टक्क्यांवरून घटून ८४ टक्क्यांवर आल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.

२०१९ मध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान दगडफेकीच्या एकूण ६१८ घटना घडल्या होत्या. तर २०२० मध्ये, याच कालावधीत केवळ २२२ दगडफेकीच्या घटना घडल्या.