येत्या गणेश चतुर्थीला रिलायन्स इंडियातर्फे जीओ फोन नेक्स्ट हा देशातला पहिला ५ जी फोन लॉंच केला जाणार असल्याची घोषणा काल मुकेश अंबानी यांनी केली. रिलायन्सची काल ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. यावेळी अंबनी यांनी वर्षभरातील आराखडे सांगितले.
अंबानी म्हणाले की, हा ५ जी फोन जीओ फोन नेक्स्ट गुगलच्या सहकार्याने तयार केला आहे. तो येत्या १० सप्टेंबरला लॉंच होईल. तसेच गेल्या वर्षभरात रिलायन्सने ७५ हजार नव्या नोकर्या दिल्याचीही माहितीही यावेळी त्यांनी दिली. यावेळी अंबानी यांनी, ग्रीन एनर्जी प्लॅनची घोषणा केली. गुजरातच्या जामनगरमध्ये ५००० एकर जागेत धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.