सुरक्षा दलांनी काल जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा एक छुपा उड्डा उद्ध्वस्त केला. यावेळी सुरक्षा दलाने या ठिकाणी असलेला शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला. या भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर व पोलीस यांनी मन्याल, दाना व कोपरा येथे संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.
यावेळी त्यांनी हा अड्डा शोधून काढला. या अड्ड्यात त्यांना ४ पिस्तुले व त्यांची ८ मॅगझिन, एक एके रायफल व तिचे दोन मॅगझिन, ५४ काडतुसे आणि इतर साहित्य सापडले. काश्मीर खोर्यात पाठवण्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याचा हा साठा अलीकडेच या भागात ड्रोनच्या साहाय्याने टाकण्यात आला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.